Friday, August 31, 2007

नेहमी असेच का व्हावे?

नेहमी असेच का व्हावे?
मी तुझी वाट बघावी
आणि तू उशिरा यावे
चूक तू करावी
आणि नेहमी मी माफ़ करावे
मी काहीतरी ठरवावे
आणि तू ते तोडावे
तुला मी सर्व सांगावे
पण तू सगळे काही लपवावे
नेहमी असेच क व्हावे?

मला रडायला येत असले
तरी तुझ्याकरता का हसावे?
सगळ्या गोष्टी सोडून
तुझ्या एका हाकेला मी का धावावे?
तुझ्या, फ़क्त तुझ्याच करता
मी माझे अस्तित्व का विसरावे?
मला उडायचे असले
तरि तुझ्यात मी का अडकावे?
दोष माझा नसला तरि,
मी स्वतलाच दोषी का ठरवावे?
नेहमी असेच का व्हावे?

मागे वळून बघशील का?

पहिल्यांदा तुला बघितले
आणि मग बघतच राहिले
तुझ्यात मी मला हरवून बसले
तुझी नजर मला बघते काहेच शोधत राहिले
खरचं, कधितरि मागे वळून बघशील का?
तुझं ते ठेवणीतलं हसणं
हसताना तुझ्या ओठांच विलगं होणं
मला वेड लावून जात
आता तुलाचं बघत बसणं मला आवडतं
तुला बघून डोळ्यांचे पारणं फ़िटतं
पण..तू ही कधितरि मला असेच बघशिल का?
तुझ्या एका नजरेसाठी
माझं मन आसुसतं
तुझ्या एका हाकेसाठी
माझे कान तरसतात
तुझ्या एका स्पर्शासाठी
माझं मन झुरत राहत
तुझ्यात काय जादू आहे
हेच कळत नाही
तुझ्याकडे मी खेचली जाते आहे
हे खोटे नाही
हे सगळं तुला सांगायचे आहे
सांगता आले नाही
तरि नजरेत दाखवयचं आहे
पण तू कधी बघतच नाहीस...
कधितरि मागे वळून बघशील का...?

ध्येयाचे शिखर

ध्येयाचे शिखर
प्रत्येकाच्या मनात असते
प्रत्येकाच्या नजरेत असते
प्रत्येकाच्या हातात असते
पण प्रत्येकाच्या नशिबात नसते
त्या शिखराची प्रत्येकाला आशा असते
प्रत्येकाची अपेक्षा असते
काहींची जिद्द असते
काहींची धमक असते तेथे पोहोचण्याची
तिथपर्यन्त पोहोचायला
करावे लागतात अतोनात कष्ट
सहन कराव्या लागतात अनेक हार
पचवावी लागतात अनेक सत्य
दाखवावे लागते आपले महत्त्व
शिखरावर चढताना
पाय खेचणारे असतात अनेक
तरिही ठेवावे लागते प्रयत्नात सातत्य
त्य टोकावर पोहोचायला
मधल्या वाटेवेर
अनेक सामन्यांना तु तोंड देशील
पण त्या यशाने तु हुरळु नकोस
कारण जे हुरळतात ते अडकतात
माहित आहे मला
तु या मृगजळात अडकणार नाहीस
पण तरिही सांगायचे आहे
कारण मला त्या शिखरावर
तुला बघायचे आहे
आपले शिखर मिळवल्याचा अभिमान
तुझ्या डोळ्यात पहायचा आहे.........

Thursday, August 30, 2007

आई

सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
खर्च जास्त करु नको म्हणताना हळूच दहा रुपये टेकवते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
रात्री निजवतान कपाळावरुन हात फ़िरवते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
जीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!

पाउस पडत होता

पाउस पडत होता
पण सर्व कोरडे होते
मी मात्र त्या पावसात
ओलेचिंब भिजले होते
पाउस पडत होता
सर्वांच्या छत्र्या बंद होत्या
पाउस सहन न होउन
माझ्या छत्रीच्या मात्र तारा वाकल्या होत्या

पाउस पडत होत
पण बाहेर रखरखाट होता
आणि माझ्या डोळ्यांमधे
पूर आला होता

पाउस पडत होता
पण कोणालाच का कळत नव्हते
समजले असते मी कोणाला तर
ढग मनातले बरसलेच नसते