Friday, October 5, 2007

ते सुखाचे क्षण......

ते सुखाचे क्षण......
आडून ढगांच्या,
रविकिरणं आज
पसरली कांतीवरं,
देत संजीवनी
जगण्याची नवीन
वारा हा बेभान
आज सूटून सोसाट्यानं
शिरला तो केसांत
नाचत- बागडत
घेऊन सुखाची लहरं
दूरून आजं,
ऐकू आला तो नाद
शरीर थिरकता,
डोलियले हे मनं
फ़ुलता खळी गालावर,
चमकले नयन
गवसले मजला आज
ते सुखाचे क्षण......