Thursday, April 22, 2010

लंडनची ट्यूब

जमिनीच्या पोटात धावणारी ही ट्यूब
भरपूर सारे जिने उतरवत आत आत घेऊन जाते
भुयारात अचानक वारा येतो
आणि ट्यूब येऊन आपले दरवाजे उघडते.

प्रवासाला बाहेर पडलेली मी
ट्यूब ची वाट पाहत असते
ट्यूबचे दरवाजे बंद होताच
माझे डोळे ही बंद करते.
प्रवास लंडन मधे करत असले,
तरी मुंबईच्या लोकल मधे पोचलेले असते.

लेडीज डब्यात नेहमीचाच ते चित्र,
अनेक प्रकारच्या बायकांची तुडुंब गर्दी असते.
कॉलेज तरुणींचा एकच कल्लोळ असतो,
बाजूच्या बायकांचा ग्रूप त्यांच्या उतरण्याची वाट पाहतो.
कुणी FM मधे दंग तर कुणी पुस्तकात गुंग,
काहींचा हा प्रवास म्हणजे हक्काची झोप असते
कुणी फोनवर ओरडत असते, कुणी गप्पा झोडत असते.
उभ्यानची भिर-भिरणारी नजर असते
बसलेल्यांपैकी कोणी उठले की त्यांच्या चेहरावर स्मीत असते.
फोर्थ सीटवरचे मिनिटा-मिनिटांनी अँगल चेंज करत असतात
तिसर्‍या सीटवर शिफ्ट होण्याची वाट पाहत असतात.
उठता उठता पटकन एक जण माझ्या पायावर पाय देते
पाय देणारी मलाच उलट बोलते,
पण माझी झोप तुटलेली असते, मी लंडन ट्यूब मधे असते,
समोरचा माणूस "सॉरी" म्हणत असतो, मी हलकेच हसते.

ट्यूब तशी बाया-माणसांनी भरलेली असते
पण गडबड, गोंधळ, आवाज यांपैकी काहीच नसते.
प्रत्येक जण कुठेतरी नजर लावून बसलेला,
हलकेच कुणीतरी बाजूच्याशी कुजबूजत असते,
फोनचे नेटवर्क नाही त्यामुळे जोरजोरात बोलणेच नसते.
अचानक वेफर्सचा वास बंद डब्यात पसरतो,
माझीपण भूक चाळावते,
इलाज नाही म्हणून पाणी पिऊन मी परत डोळे बंद करते.

बाजूची बाई समोसे कोम्बत असते,
मी पुढच्या स्टेशनवर चढणार्‍या पॉपकॉर्न वाल्याची वाट पाहत असते.
गर्दी आता वाढलेली असते,
त्यातच एक जण दुसरीची ओढणी खेचते
भांडणाला सुरूवात होते,
दोन बाया भांड भांड भांडतात, बघे आपली मजा घेतात.
त्या गर्दीतही विक्रेते त्यांचे ट्रे पास करत असतात,
मी त्यांची ही कसब पाहत असते.

विंडो सीट मुळे मी खूश असते,
बघण्यासारखे बाहेर असे काहीच नसते,
तरी आपले मन रमते.
गरम्यात ती हवा सुखद वाटते, अलगद डोळे बंद करवते.
दादर येते आणि झोप माझी तुटते,
Oxford Circus वर ट्यूब थांबलेली असते.

आता ट्यूब पूर्ण भरलेली,
तरीही अतिशय शांत असते
ना धक्काबुक्की ना भांडण,
या शांततेला माणस कंटाळात कशी नाहीत?
मूक-बधिर आहेत की काय सारे अशी शंका येते.
एक एक स्टेशन जाउन माझी उतरायची वेळ येते,
स्टेशनवर पाय ठेवते आणि बोरीवलीची आठवण येते
काय फरक मुंबई आणि लंडन मधे हे तेव्हा कळते.
उद्या आहे की परत प्रवास! असे मनाला समजवते
ट्यूब सुरू झाली की मी मुंबईतच असते
ट्यूब सुरू झाली की मी मुंबईतच असते.

9 comments:

Prathamesh said...

solid!!!

Prathamesh said...

mast!!

Ketaki said...

Thanks prathamesh

shailesh ambre said...

dhamaal...aavdali.. :)

Ketaki said...
This comment has been removed by the author.
Ketaki said...

Thanks shailesh

sandiskp said...

Nice tu swata lihilis ka?

Rupesh Talaskar said...

Waoooov!!!! Fantastic...!!!!

Unknown said...

This is pure nostalgic. Very well written.