Monday, June 11, 2007

ओळख




कोण येते
कोण जाते
पण त्याला काहीच
घेणे-देणे नाही
तो चालतच राहतो
कोणी ओळख दाखवते
कोणी अनोळखी बनते
पण तो कोणालाच
ओळखत नाही
कोणी रागवते
कोणी हसते
पण त्याला काहीच
फरक पडत नाही
कोणी सावरते
कोणी धडपडते
पण तो कोणालाच
हात देत नाही
तो चालतच राहतो
अचानक तो थांबतो
अचानक घाबरतो
पण कोणाचेच लक्ष नाही
तो पडतो-धडपडतो
पण कोणीच बघत नाही
त्याचा शेवटचा श्वासही
त्याच्या बरोबर नसतो
जमिनीवर फक्त त्याच्या
शरिराचा भार असतो
पण कोणी
उचलायलाही जात नाही
तो आंधळा असतो
त्याने काहीच पाहिलेले नसते
पण डोळस दुनियेनेही
त्याचे आंधळेपण ओळखलेले नसते

No comments: