Monday, June 11, 2007

अरे माझ्या मना


अरे माझ्या मना ,
कधीतरी माझे ऐक ना
अरे किती करशील विचार
झालेल्या गोष्टींचा
किती देशील दोष स्वतःला
दुस-यांच्या चुकांचा
किती भरकट्शील आशे पोटी
पाठ भिरकावलेल्यांकडे

किती गाळशील आसवे तू
त्या पाषाणहृदयांपुढे
किती समजावशील त्यांना
परत इथे यायला
किती मागशील माफ़ी
त्यांचे मान राखायला
किती घालवशील तुझा आत्मसन्मान
त्यांचा गर्व सांभाळायला

अरे माझ्या मना ,
सांग कसे थांबवू मी तुला
का करतो आहेस प्रयत्न
परत तीच चूक करायला.

No comments: